पुणे

उमाजी नाईक जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती; भिवंडीत शासकीय सोहळ्याचे आयोजन

अमृता चौगुले

सासवड; पुढारी वृत्तसेवा: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा 231वा शासकीय जयंती सोहळा बुधवारी (दि. 7) भिवडी (ता. पुरंदर) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे, अशी माहिती जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजे उमाजी नाईक यांच्या समाधिस्थळी (खोमणेमळा) सकाळी 6 वाजता अभिषेक, पूजा व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. राजे उमाजी नाईक यांच्या शासकीय स्मारकात 231 व्या जयंतीनिमित्त 12:00 वाजता मानवंदना देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर राज्यातील विविध खात्यांचे मंत्री यांच्या उपस्थितीत जयंतीचा कार्यक्रम होणार आहे.

या जयंती सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील रामोशी, बेरड, बेडर समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत, असेही शितोळे यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारला समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 7 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागण्यांसंदर्भात मोठी घोषणा करणार आहेत. या जयंती सोहळ्यास बहुजन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शितोळे यांनी या वेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT