पुणे

इंद्रायणी, लगतच्या विहिरींचे पाणी पिणे, वापरण्यास बंदी

अमृता चौगुले

आळंदी, पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा काळात इंद्रायणी नदी प्रदूषित होईल असे कृत्य करण्यास व नदी पात्राच्या दोन्ही बाजूस असलेले पाणी व विहिरींचे पाणी पिण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बंदीचे आदेश दिले आहेत.

नदीतील पाणी व शहरातील विहिरींचे पाणी हे केवळ भांडी घासण्यासाठी व तत्सम कामासाठी वापरता येणार आहे. पिण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेचे पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत इंद्रायणी प्रदूषणात वाढ झाली असून पाणी पिणेच नाही तर वापरण्यायोग्यदेखील राहिलेले नाही.

मात्र भाविक आरोग्याचा विचार न करता हे पाणी प्राशन करत असतात. यामुळे त्यांना प्रशासनाने आरोग्याचे हित पाहता पाणी पिण्यास वापरू नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर कोविडसदृश संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींनी आळंदीत प्रवेश करू नये, असेही आदेश काढण्यात आले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT