पुणे

…अखेर जिल्हा रुग्णालयातील प्रतीक्षालय सुरू

अमृता चौगुले

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : नवी सांगवीतील जिल्हा रुग्णालयातील प्रतीक्षालय बंद असल्याने नातेवाईकांचे हाल होत होते. या संदर्भातील वृत्त 'दैनिक पुढारी' मध्ये प्रसिद्ध होताच प्रतीक्षालय सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने कोट्यावधी रुपये खर्च करून मोठ्या दिमाखात नवी सांगवीत रुग्णालय उभारण्यात आले आहे.

हे प्रतिक्षालय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक कार्यक्रमा अंतर्गत सन 2018-19 साली 22 लाख 6 हजार 188 रुपये खर्च करून रुग्णालयात रुग्णांचे प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णांचे प्रतिक्षालय बंद अवस्थेत होते. दोन्हीही दरवाजांना टाळे लागले होते. रुग्णांच्या नातेवाईकांना बंद प्रतिक्षालय पहावे लागत होते. प्रतिक्षालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली होती. याबाबत जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी यांनी पाठपुरावा केला हे प्रतीक्षा लय सुरू झाल्यामुळे रुग्णावर नातेवाईकाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT