पुणे

शिक्रापुरात तरुणाची आत्महत्या

अमृता चौगुले

शिक्रापूर : येथे एका 23 वर्षे तरुणाने बुधवारी (दि. 24) गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण ब्रम्हानंद भाकरे (वय 23, मूळ रा. गडगा, ता. नायगाव, जि. नांदेड सध्या गजानन मंगल कार्यालयाजवळ, शिक्रापूर, ता. शिरूर) असे या युवकाचे नाव आहे. भाकरे हा करंजे मार्केट परिसरात चायनीजची गाडी चालवीत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी भाकरे याच्या रूममध्ये राहणारा मारुती माधवराव पवार हा रांजणगाव येथील कंपनीतील आपली ड्युटी संपवून शिक्रापूर येथे परतला. रूमचा दरवाजा लावला असल्याने त्याने भाकरे यांना आवाज दिला, प्रतिसाद न आल्याने दरवाजा ढकलून घरात पाहिले असता भाकरे याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT