Crime News: टोळक्याकडून तरुणाला मारहाण; वाचवायला आलेल्या आईलाही मारहाण  File Photo
पुणे

Crime News: टोळक्याकडून तरुणाला मारहाण; वाचवायला आलेल्या आईलाही मारहाण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: घोळक्यात उभ्या असलेल्या मित्राला बरोबर चल, असे म्हणाल्याने टोळक्याने तरुणाला ’तू मोठा शहाणा झालास का’, असे म्हणून दगड, फरशीने मारहाण करून जखमी केले. आई वाचवायला आली तर तिलाही मारहाण केली. मुलाला घेऊन आई उपचारासाठी रुग्णालयात गेली असता टोळक्याने घरात शिरून सामानाची तोडफोड केली.

याबाबत सुमीत सावंत (वय 21, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील समाज मंदिर येथे 16 मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री कळस येथे जाणार होते. त्यासाठी ते घरातून बाहेर पडले. समाज मंदिराजवळ मुले उभी होती. फिर्यादी व त्यांच्या मित्राने या मुलांमधील एका मित्राला आपल्याबरोबर चल असे म्हणाला.

त्यावर टोळक्यातील मुलांनी फरशीने मारहाण केली. त्याला वाचविण्यासाठी त्याची आई मध्ये पडली असता त्यांनाही या टोळक्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मोठमोठ्याने ओरडून आम्ही इथले भाई आहोत, आमच्या वाट्याला जायचे नाही, नाहीतर आम्ही कोणाला सोडणार नाही, असे म्हणून दहशत निर्माण केली.

त्यामुळे लोक घाबरून निघून गेले. फिर्यादी हे जखमी झाल्याने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी गेले होते, तेव्हा हे टोळके त्यांच्या घरात शिरले. त्यांनी घरातील फ्रिज, गॅस शेगडी व इतर सामानाची तोडफोड केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT