पुणे

पुणे : दुचाकी-ट्रकच्या भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा रस्त्यावरील नवीन दरी पुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला. रिदा मुकादम (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर नटराज अनिलकुमार (वय 30) हा जखमी झाला आहे.

याप्रकरणी नटराज यांच्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दोन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास घडला. नटराज व रिदा हे मित्र असून, दोघे दुचाकीवरून पुणे-सातारा रस्त्याने जात होते. दरी पूल येथे आल्यानंतर मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रिदा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता चालक पसार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT