येरवडा : येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात शुक्रवारी (ता. ०५) रोजी संध्याकाळी नऊच्या दरम्यान बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.
नगरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. या वाहनातून चार प्रवासी प्रवास करीत होते सर्व प्रवासी सुखरूप असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याचे अग्निशमन केंद्राचे प्रभारी उप अग्निशमन अधिकारी नवनाथ वायकर यांनी दिली.
या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या वेळी ड्राइवर रघुनाथ भोईर, फायरमन छगन मोरे, श्रीराम कराड, आदिनाथ फेगडे, पंकज पवार यांनी काम पाहायचे. नगरच्या दिशेने जाणारी 'टाटा नेक्सन' (एमएच १२ व्ही एल २८४६) हिच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे वाहनचालकाच्या निदर्शनास आल्याने वाहनचालकाने सर्वांना सुखरूप खाली उतरवले आणि अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. वाहन घटनास्थळी दाखल होतच अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.