येरवडा: येरवडा येथील पर्णकुटी चौकात रात्र पाळीवर असणाऱ्या अमित प्रेम चंदा (वय ३६) या पालिका सफाई कामगारावर कचरा टाकू दिला नाही या कारणास्तव दोघांनी लाथा बुक्यानी तसेच दगडानी मारहाण करण्यात आली. यात सफाई कामगार यांच्या उजव्या डोळ्या खाली तसेच डोक्याला मार लागला आहे. शिवा शेंडकर (वय ५५ ) तसेच ऋषिकेश शेंडकर ( वय २८) यांच्या विरोधात चंदा यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. (Latest Pune News)
पर्णकुटी चौक येथील क्रॉनिक पॉईंट येथे (ता. २४) रोजी रात्रपाळी वर चंदा हे कर्तव्यावर होते. रात्री ११:३० च्या दरम्यान शिवा शेंडकर हे दुचाकीवरून सदर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी आले असता. चंदा यांनी कचरा टाकू नका असे सांगितले याचा राग आल्याने शेंडकर यांनी फोन करून मुलगा ऋषिकेश शेंडकर याला बोलावून घेतले दोघांनी चांद यांना लाता बुक्क्याने तसेच दगडाने मारहाण केली. नागरिकांनी मध्यस्थी करीत भांडणे सोडवली. येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.