June 12 Monsoon Activity IMD Forecast
पुणे: मान्सून मुंबई,पुणे शहरात अडखळला असला तरी उत्तर भारतात तयार झालेला पश्चिमी चक्रवात आणि पूर्वोत्तर राज्यातील अतिवृष्टीचा काहीसा परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे 9 जून पर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.12 जून नंतर मान्सून पुन्हा सक्रीय झाल्यास पावसाचा जोर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोकणात 25 मे रोजी मान्सून आला. पुढे 26 मे रोजी मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर शहरात दाखल झाला. मात्र 26 ते 5 जून असे दहा दिवस तो याच शहरात अडखळला आहे. कारण राज्यात हवेचे दाब अनुकूल नाहीत. सध्या राज्यात 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत. ते दाब 900 ते 1000 हेक्टा पास्कल इतके झाले तरच मान्सून पुढे जाईल, अशी माहिती हवामान शस्त्रज्ञांनी दिली. साधारणपणे 12 ते 15 जूनपर्यंत मान्सून पुढे जाण्यास पोषक वातावरण तयार होत आहे.
ठाणे (6), रायगड (6), जळगाव (7), नाशिक(6), अहिल्यानगर (6 ते 8), पुणे (6 ते 8), कोल्हापूर (6), सातारा (6 ते 8), सांगली (7,8), छ.संभाजीनगर (6 ते 8), जालना (8,9), परभणी (7,8),बीड (7), धाराशिव (6), अकोला (6 ते 9), लातूर (6), अमरावती (6 ते 8), भंडारा (9), बुलडाणा (6 ते 9), चंद्रपूर (6 ते 9), गडचिरोली (6,7,8), गोंदिया (9), नागपूर (6 ते 9), वर्धा (6 ते 9), वाशिम (8,9)