पुणे: सोमवारी 14 रोजी कोकणसह राज्यातील काही भागांत मध्यम पाऊस पडेल. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्यातून मोठा पाऊस पूर्णपणे थांबत असून, पाऊस 17 जुलैपर्यंत सुटीवर जात आहे. त्यामुळे बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहून कडक ऊन पडेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात होईल. कारण, हवेचा दाब जुलैच्या तिसर्या आठवड्यात अनुकूल होत आहे. सोमवारी 14 जुलै रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे घाट, सातारा घाट या भागांतच पाऊस पडेल. त्यानंतर बहुतांश भागांत 17 जुलैपर्यंत कोरडे वातावरण राहील. (Latest Pune News)