पुणे

खडकवाडीला आखाड्यात निकाली कुस्त्या

अमृता चौगुले

लोणी-धामणी(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : खडकवाडी येथे श्री भैरवानाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. पुणे, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, शिरूर, भोसरी, पारनेर, संगमनेर येथील नामवंत मल्लांनी हा आखाडा गाजविला. कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. एकूण 40 हजार रुपयांची बक्षिसे या वेळी विजेत्यांना देण्यात आली. निकाली कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

मानाची व शेवटची कुस्ती शिरूर केसरी आदित्य पवार व श्रेयश होळकर यांच्यात झाली. कुस्ती आखाड्याचे नियोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष नाथा सुक्रे, माजी सरपंच अनिल डोके, संतोष सुक्रे, विलास सुक्रे, काशिनाथ वाळुंज, नथू सुक्रे, दतात्रय सुक्रे, बाळासाहेब सुक्रे, वसंत भागवत, उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी केले. या वेळी विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विविध गुणदर्शन
श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त दरवर्षीच्या तमाशाच्या खर्चीक परंपरेला फाटा देत माजी विद्यार्थी संघटना व समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटीने अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय यांच्या सहकार्याने मुलांच्या विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कलाविष्काराचा कार्यक्रम आयोजित केला. यानिमित्त एक नवा पायंडा त्यांनी पाडला. लोककला, नाटक, लावणी, समाजप्रबोधनपर
गाणी सादर करीत मुलांनी ग्रामस्थांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन सुरेश वाळुंज, दीक्षा वाळुंज यांनी केले.

SCROLL FOR NEXT