पुणे

पौड : पेरिविंकलचा ‘महाराष्ट्र केसरी’ झालेला बघायला आवडेल : शिवराज राक्षे

अमृता चौगुले

पौड; पुढारी वृत्तसेवा : 'पेरिविंकल स्कूलचे खेळातही मोठे योगदान असून, माझी प्रेरणा घेऊन पेरिविंकलचा 'महाराष्ट्र केसरी' झालेला मला बघायला आवडेल. पेरिविंकलकडून माझा झालेला सन्मान कायम स्मरणात राहील, असे गौरवोद्गार 'महाराष्ट्र केसरी' शिवराज राक्षे यांनी बावधन येथे व्यक्त केले. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक क्रीडादिनाचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र चॅम्पियन योगेश धावडे, ओंकार दगडे, गणेश मोहोळ, संदीप ढमढेरे, पैलवान नवनाथ राक्षे, अनिश मोहोळ, कैलास जाधव, वस्ताद बाळासाहेब दांगट, पैलवान बाळू बोडके, संचालक यश बांदल, शाळेच्या संचालिका रेखा बांदल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या हस्ते शिवराज राक्षे यांचा शाल, श्रीफळ, भक्ती-शक्तीची प्रतिमा तसेच 51 हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. मुलांमधील चपळता, समन्वय आणि समयसूचकतेचा कस लावणार्‍या या क्रीडाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

खो-खो मॅचचा टॉस 'महाराष्ट्र केसरी' शिवराज राक्षे यांच्या हस्ते करून पहिल्या मॅचची सुरुवात करण्यात आली. राक्षे यांच्या उपस्थितीने मुलांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका रुचिरा खानवलकर, क्रीडाशिक्षक आदित्य पवार, श्रेयस गायकवाड यांनी केले होते. सूत्रसंचालन रुचा हल्लूर यांनी केले.

SCROLL FOR NEXT