मंचर; पुढारी वृत्तसेवा : दत्तात्रयनगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022-23 मधील उत्पादित 2 लाख 21 हजाराव्या पोत्याचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, सिव्हील इंजिनिअर अमीर पठाण, पर्चेस ऑफिसर ब्रिजेश लोहोट तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गाळप हंगाम 2022-23 मध्ये कार्यक्षेत्र व परिसरामधील 2 लाख 21 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी 10.33 टक्के साखर उतार्याने 2 लाख 24 हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2022-23 चा गळीत हंगाम चालू असून ऊस उत्पादक शेतक-यांच्या नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप यशस्वीरीत्या करण्यात येईल. सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी भीमाशंकर साखर कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले.