पुणे

कळंबला उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान; महिलांच्या कुस्त्या होणार मॅटवर

अमृता चौगुले

वालचंदनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : कळंब येथे शुक्रवारी (दि. 5) लाल मातीतील कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले आहे. या मैदानात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पहिलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. प्रामुख्याने याच मैदानात महिलांच्या मॅटवरील कुस्त्या होणार असल्याची माहिती फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली. दिवंगत बाबासाहेब फडतरे यांच्या स्मरणार्थ कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे.

या मैदानात इराण देशातील मल्ल कुस्ती खेळणार आहेत, शिवाय पंंजाब, हरियाणा, कोल्हापूरमधील नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. प्रथम क्रमांकाची कुस्ती 'हिंदकेसरी' सिंकदर शेख विरुद्ध हरियाणाचा पहिलवान मनजितसिंग खत्री यांच्यामध्ये रंगणार आहे.

याशिवाय सराटी येथील पहिलवान माउली कोकाटे विरुद्ध पंजाबचा पहिलवान सतेंन्द्र, 'महाराष्ट्रकेसरी' पृथ्वीराज पाटील विरुद्ध 'उपमहाराष्ट्र केसरी' प्रकाश बनकर, इराणचा पहिलवान मेहर इराणी विरुद्ध 'हिंदकेसरी' माउली जमदाडे यांच्यामध्ये लढती होणार आहेत. फडतरे उद्योग समुहाच्या वतीने पहिली महिला 'महाराष्ट्रकेसरी' पहिलवान प्रतीक्षा बागडे व 'शिवराय केसरी' किताब पटकविणारा पहिलवान महेंद्र गायकवाड यांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT