तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील माळीमळा येथे आजाराला कंटाळून महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संगीता दत्तात्रय बांदल (वय 45, मूळ गाव बजाजनगर, जि. औरंगाबाद, सध्या रा. माळीमळा, तळेगाव ढमढेरे) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तळेगाव ढमढेरे गावचे पोलिस पाटील पांडुरंग नरके यांना फोन करून माहिती दिली.