पुणे

खुर्चीला चिकटून बसलेले ‘वसुलीवाले’ बदलले जाणार?

Laxman Dhenge

[author title="दीपक देशमुख" image="http://"][/author]

यवत : पुढारी वृत्तसेवा : बदल्यांची माहिती सादर करण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व खातेप्रमुखांना पत्र दिल्याने जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे राहून काम कमी आणि वसुली जास्त करणारे खातेप्रमुख आता बदलले जाणार आहेत.
शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषद वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही वेळचे वेळी होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमधील प्रत्येक संवर्गासाठी वास्तव ज्येष्ठता सूची करणेकामी सन 2024 सर्वसाधारण बदल्यांच्या पूर्वतयारीसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या पत्रान्वये सर्व कर्मचार्‍यांची मूळ सेवापुस्तकावरून सेवाज्येष्ठतेनुसार प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांची संवर्गनिहाय अचूक माहिती सादर करण्याबाबत पत्राद्वारे सर्व विभागप्रमुखांना कळविण्यात आले होते.

ज्येष्ठता व सेवापुस्तके तपासण्याचा वरिष्ठांना विसर

विनंती बदलीने तीन वर्षे व आपसी बदलीने पाच वर्षे सेवा केल्यानंतर ज्येष्ठता पाहून बदली होणे अनिवार्य आहे. परंतु, खुर्चीला चिकटून बसलेल्यांना वाचविण्यासाठी ज्येष्ठता व सेवापुस्तके तपासण्याचा वरिष्ठांना विसर पडल्याचेही दिसून येत आहे. या पत्रामध्ये ज्येष्ठता पाहताना मूळची सेवापुस्तके तपासून बदलीस पात्र व अपात्र, असा स्पष्ट अभिप्राय नोंदविणे अनिवार्य असताना तो नोंदविला नाही, बदली शासन निर्णयनुसार विभागप्रमुख, खातेप्रमुखांनी आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय देणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे. त्यामुळे वर्ग 3 व वर्ग 4 मधील बदलीस पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांना मलिद्यासाठी खुर्चीला चिकटून बसलेल्या कर्मचार्‍यांना कोणत्या वरिष्ठ अधिकार्‍याची आता वसुली खुर्ची सोडून जावे लागणार, हे नक्की.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT