कामशेत : पुढारी वृत्तसेवा : अंदर मावळात टाकवे बुद्रुक येथे सोमवारी आठवडे बाजार भरतो. तर पवन मावळात पवनानगर येथे बाजारपेठ आहे. पण नाणे मावळात आठवडे बाजार भरत नाही. तो कशी भरणार याबाबत शेतकर्यांना प्रश्न पडला आहे. मावळ तालुका हा तीन मावळ विभागात विभागलेला आहे. यामध्ये अंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ असा आहे. मात्र, नाणेमावळ येथे एखादी मोठी बाजारपेठही नाही. त्यामुळे खर्या अर्थाने आठवडे बाजाराची गरज आहे. नाणे मावळात नाणे, कांब्रे गोवित्री, कोंडीवडे, करंजगाव, थोरण जांभवली भाजगाव, साबळेवाडी मोरमारवाडी उंबरवाडी सोमवडी,ऊकसान,साई,वाउंड, पठार इत्यादी गावे नाणे मावळ परिसरात येत असतात. येथील लोकांना बाजारपेठ जवळ नसल्यामुळे त्यांची खुप मोठी अडचण होत आहे.
किराणामाल भाजीपाला व इतर गोष्टींसाठी कामशेत बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. व गावात मिळणारा बाजार हा महाग मिळतो कामशेत बाजारपेठेपेक्षा जास्त पैसे वस्तूसाठी मोजावे लागतात. खास बाजारासाठी कामशेतला यावे लागते. पाच किलोमीटरपासून ते पंचवीस किलोमीटरपर्यंत असणार्या गावातील लोकांना खरेदीसाठी कामशेतला यावे लागते. त्यासाठी त्यांना बस व खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो. शिवाय प्रवासासाठी लागणारा खर्च करावा लागतो व वेळ ही बर्याच प्रमाणात जातो दिवसातून एक ते दोन एसटी आहेत व खाजगी वाहनांचे प्रमाण ही कमी आहे. संपूर्ण दिवस हा बाजारासाठी जातो. शिवाय वाहनातून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करण्यासाठी आहे. त्यामुळे नाणे मावळात बाजारपेठ असणे गरजेचे आहे.
नाने मावळात नाणे, कांब्रे, गोवित्री ही मोठी गावे असून ती नाणेमाळाच्या मध्यभागी असून या ठिकाणी बाजारपेठ होऊ शकते पण याची दखल कोण घेणार व खरच नाणे मावळात बाजारपेठ भरणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. पण येते राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व स्थानिक नेत्यांचे या मुद्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रत्येक पक्ष फक्त पाणी आणि रस्ते याच विकासाच्या गोष्टी करतात पण त्याचबरोबर अवश्य असणारे बाजारपेठ याची मागणी कोणी शासनाकडे करताना दिसत नाही. नाणे मावळत आठवडे बाजाराची खर्या अर्थाने गरज आहे. कारण येथील शेतकर्यांना व ग्रामस्थांना खरेदीसाठी काम कामशेतला जावे लागते. यामुळे शेतकर्यांची ग्रामस्थांची खूप मोठी अडचण होत आहे.