पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातून मोठी ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी उभी केली जाईल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पहिल्या कार्यकारिणी बैठकीत केला. शहर कार्यकारिणीमध्ये सर्व घटकांतील ज्येष्ठ, महिला, पुरुष, युवक-युवती, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी करून सर्वांना काम करण्याची योग्य संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मानकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर राष्ट्रवादीची पहिली कार्यकारिणी झाली. या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रवक्त्या रूपाली ठोंबरे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्याध्यक्षा पूनम पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, शंकर केमसे, अप्पा रेणुसे, बंडू गायकवाड, प्रकाश कदम, महेश शिंदे, सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, प्रिया गदादे, भैयासाहेब जाधव, सदानंद शेट्टी, बाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मानकर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करू.
आगामी काळात शहरात पक्षाचे धोरण आणि भूमिका ही पुणेकरांचे हित लक्षात घेऊनच असेल. पक्षाचे शहर कार्यालय नव्याने उभे केले जात असून, ते माझ्या वैयक्तिक नाही तर पक्षाच्या नावेच असेल ही हमी देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :