पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या File Photo
पुणे

Pune Crime: संतापजनक! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव ढमढेर: सणसवाडी (ता. शिरूर) येथील महिलेला वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कसोडपत्रानंतर मिळणार असलेले पैसे मागण्यासाठी पतीने छळ केल्याने एका विवाहितेने सोमवारी (दि. 13) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

छाया विधाटे (वय 40) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत महिलेची बहीण जया गवळी (वय 36) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा पती विजय विधाटे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सणसवाडी येथील छाया विधाटे यांच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या जमिनीचे सर्व मुलींकडून हक्कसोडपत्र करून घेतले. तसेच मुलींना काही पैसे देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर छाया यांचा पती विजय वारंवार पत्नीला वडिलांकडून हक्कसोडचे पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावत शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून छळ करत होता. याबाबत छाया यांनी त्याच्या बहीण व भावाला सांगितले होते. त्यानंतरही विजयकडून छळ सुरू असल्याने छायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT