पुणे

पिंपरी: केक फेकून दिल्याने पतीला मारहाण

अमृता चौगुले

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पत्नीने लग्नाच्या वाढदिवसासाठी आणलेला केक पतीने फेकून दिला. त्यावरून पत्नीने पतीवर गाडीच्या चावीने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 23) औंध हॉस्पिटल कर्मचारी क्वार्टर येथे घडली. राहुल गौतम धेंडे (40, रा. औंध हॉस्पिटल कर्मचारी क्वार्टर, औंध) असे जखमी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पत्निविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांची पत्नी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आली होती. दरम्यान, त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्या वेळी फिर्यादी यांनी शिवीगाळ करीत गाडीवर ठेवलेला केक फेकून दिला. त्यावरून फिर्यादी यांच्या पत्नीने फिर्यादीवर वार करून त्यांना जखमी केले. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT