पुणे : पीएमपीने घोषणा केलेल्या डबल डेकर बस पुण्यात कधी धावणार, आम्हाला त्या बसमध्ये बसून प्रवास कधी करता येणार, असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून केला जात आहे. तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ‘डबल डेकर’ ई-बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे ‘डबल डेकर’ खरेदीला पीएमपीच्या संचालक मंडळाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता दोन्ही महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर डबल डेकर बस शहरात आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
एकत्रित निर्णय घेण्याची गरज
तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ‘डबल डेकर’ बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्या वेळी तत्कालीन दोन्ही महापालिका आयुक्तदेखील या बैठकांना होते.
मात्र, आता नवीन दोन्ही महापालिका आयुक्तांकडून याबाबत बरेच दिवस झाले तरी याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे समोर येत आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांनी एकत्रित पावले उचलून निधी उपलब्ध करून पुण्यात डबल डेकर धावण्याचे पुणेकर प्रवाशांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
ठराव मंजूर
तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ‘डबल डेकर’ ई-बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘डबल डेकर’ खरेदीला आणि पुण्यात या बस धावण्यालाही मार्ग मोकळा झाला आहे.100 मधील 20 बस डबल डेकर पीएमपीच्या ताफ्यात 1887 बस आहेत.
पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील प्रवाशांची संख्या पाहता ती अतिशय कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासन ताफ्यात आगामी काळात भाडेतत्त्वावरील 100 इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहेत. त्यातील 80 बस 12 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस असणार आहेत. तर, यातील 20 बस डबल डेकर असणार आहेत, अशी माहिती दै. ‘पुढारी’शी बोलताना पीएमपी अधिकार्यांनी दिली.
डबल डेकरचे फायदे
इलेक्ट्रिक असल्याने प्रदूषण रोखण्यास मदत
इंधनाची बचत; एसीमुळे थंडगार प्रवास
एकाच बसमधून दोन बसच्या
क्षमतेच्या प्रवाशांची वाहतूक शक्य
उत्पन्नात होणार वाढ
प्रवाशांचे थांब्यांवरील वेटिंग कमी होणार
शहराच्या विकासात भर पडणार