पुणे

तळेगावकरांची भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुक्तता कधी

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा:  तळेगाव दाभाडे आणि स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कुत्री चौकात, रस्त्यावर टोळक्याने वावरतात. येणाऱ्या-जाणा-यांचा आणि वाहनचालकांचा पाठलाग करुन चावा घेतात, तसेच वृध्द, जेष्ठ नागरिक, महिला, लहानमुले, बालके, रात्रपाळी कामगारांना ही कुत्री फारच तापदायक ठरत आहेत. रात्री-अपरात्री कुत्री इमारतींच्या पार्किंगमध्ये झोपतात, भेसुर ओरडतात, घाण करतात, वाहनांचे सीट, टायर, प्लास्टीक फाडून नुकसान करतात.

वीज कर्मचारी वसाहतीतील रहीवाशांना तर कुत्र्यांनी सळो की पळो केलेले आहे. अनेकवेळा तेथील लहान मुलांना देखील कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हे श्वान नागरीकांवर सतत धावत असतात. वीज कामगारांना रात्री अपरात्री तातडीच्या कामासाठी परिसरात जावे लागते. त्यांना ही कुत्री धोकादायक ठरत आहेत.

तरी प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे. सोसायटी, अपार्टमेंटमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास परवानगी नसताना अनेकजण कुत्री पाळत आहेत. या बाबतही प्रशासनाने दखल घ्यावी अशीही नागरिकांची मागणी आहे. श्वान पाळणारांनी कुत्री कोणास चावणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, जर कुत्रे एखाद्याला चावले तर त्याच्या मालकावर कारवाई झाली पाहीजे. अशीही नागरिकांची मागणी आहे.

SCROLL FOR NEXT