पुणे

जळोची : श्रायबर डायनामिक्सकडून रुईमध्ये विहिरीची स्वच्छता

अमृता चौगुले

जळोची; पुढारी वृत्तसेवा : बारामती एमआयडीसीमधील श्रायबर डायनामिक्स डेअरीच्या वतीने रुईमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी प्रा. अजिनाथ चौधर, शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नवनाथ चौधर, कंपनीचे हेमंत चव्हाण, मानसिंग मांडे आदी उपस्थित होते.
रुई गावातील महादेव मंदिरानजीक असलेल्या 50 फुटी विहिरीमध्ये अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात होता.

त्याचप्रमाणे शेवाळ साचून पाण्याची दुर्गंधी येत होती. सामाजिक कार्यकर्ते प्रा. चौधर यांच्या पाठपुराव्याने कंपनीने स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे विहीर स्वच्छ होऊन पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. विहिरीच्या पाण्यावर आकर्षक कारंजे बसविले जाईल व शेजारील जागेत बारामती नगरपरिषदेच्या वतीने दिवसा व रात्री दिसतील असे एलईडीचे आकर्षक रंगसंगतीमध्ये बोर्ड लावले जाणार असल्याची माहिती बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT