पुणे

Weather Forecast : यंदाचा उन्हाळा राहणार कडक

Laxman Dhenge

पुणे : यंदा अल निनोचा प्रभाव जून 2023 पासून सुरु झाला तो मे 2024 अखेर पर्यंत राहणार आहे. हा प्रभाव नेमका उन्हाळ्यात तीव्र राहणार आहे. त्यामुळे विषुवृत्तीय तापमानात एक ते दीड अंशांनी वाढणार आहे. गेल्या पंचवीस वर्षातील वाढत्या वृक्षतोडीमुळे अल निनो पाठोपाठ ला-निना या सायकलची वारंवारता वाढल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. भारतात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर असल्याने आपल्याला मोठा फटका या सायकलचा बसतो आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच तापमानात मोठी वाढ दिसेल, असेही मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रशांत महासागराचे तापमान आणि वारे यासह हिंदी महासागरातील या स्थितीचा परिणाम भारतीय उपखंडावर सतत होत असतो. तसाच यंदा अल निनोच्या बाबतीत झाला आहे. जून 2023 पासून अल निनो सक्रीय झाल्याने उष्णतेत वाढ होत ती मार्च ते मे दरम्यान तीव्र होणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे. विषुववृत्तीय सागरी पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे.

या पूर्वी कधी होती स्थिती….

दैनिक पुढारीने या बाबत सप्टेंबर 2023 मध्येच या बाबत सविस्तर वृत्त सर्व प्रथम दिले होते. आयआयटीएमयाचा पुन्हा संदर्भ नेचर या शोधपत्रिकेत शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यानुसार या पूर्वी 1972 ते 1973, 1982 ते 1983, 1997 ते 1998 आणि 2015 ते 2016 या वर्षांमध्ये अशाच प्रकारची स्थिती उद्भवल्यानं जगभरातील अनेक देशांना तीव्र तापमान, दुष्काळ आणि पूरस्थितीचा सामना करावा लागला. 2024 मध्ये अशाच प्रकारची स्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अल निनो अधिक तीव्र होणार…

एल-निनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक स्थिती आहे. महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान सुमारे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत असते . मात्र त्या तापमानात आणखी वाढ होऊन ते 30 ते 35 अंशापर्यंत जाते तेव्हा तीव्र अल निनो असे म्हटले जाते.

  • नेचर या शोधपत्रिकेतील ताज्या शोधनिबंधात शास्त्रज्ञांचा दावा
  • फेब्रुवारीतच कमाल तापमानात मोठ्या वाढीचा अंदाज
  • मे अखेरपर्यंत अल निनोचा प्रभाव राहणार
  • सागरांच्या तापमानात वाढ 1 ते 1.5 अंशांनी वाढ होणार
  • एल निनो-सदर्न ऑसिलेशन म्हणजे उबदार एल निनो आणि थंडला निना टप्प्यांमधील अनियमित आवर्तन आहे. जागतिक हवामानावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
  • सागरी खंडावरील जंगलतोड एल निनो ते ला निना परिस्थितीला जलद करते.
  • जंगलतोड सुरू राहिल्यास एल निनो नंतर ला निना येण्याची शक्यता जास्त आहे.
  • गत 25 वर्षांच्या सरकत्या एल निनो इव्हेंट्सच्या एकूण संख्येमध्ये ला निना इव्हेंट्स ठळकपणे वाढले. 1980 पूर्वी 40 टक्के, पुढच्या दशकात 70 टक्के तर अलीकडच्या दशकांत ला निना घटनांनंतर एल निनोच्या घटनांच्या संख्येत झाली आहे.
  • सन 2001-2019 दरम्यान जंगलाच्या आच्छादनाचा ट्रेंड हवामान आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करतोय.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT