मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याने बारामती पंचायत समितीमार्फत तसेच सामाजिक संघटनांकडून गावोगावी नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मोरगाव परिसरात पाणी टंचाईमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ही समस्या लक्षात घेऊन एस.एम. के. फाउंडेशन पुणे व रोहिणीताई युवा मंचच्या अध्यक्षा रोहिणी कदम यांनी 27 एप्रिलपासून टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. मोरगाव गावठाण, वॉर्ड नं. 1 ते वार्ड नं. 5 या ठिकाणी पाणी वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. एक मोठा टँकर व एक लहान टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती मंचचे पदाधिकारी महेश जाधव यांनी दिली.
हेही वाचा