सासवड: पिलाणवाडी धरणातून शिवरी प्रादेशिक योजनेद्वारे शिवरी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. धरणाची एकूण साठवणक्षमता 69.22 दशलक्ष घनफूट इतकी असली, तरी सध्या धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याचे गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी सांगितले.
खळद, एखतपूर-मुंजवडी, वाळुंज, निळुंज, बेलसर, तक्रारवाडी, साकुर्डे या गावांसाठी पिलाणवाडी जलाशयावरून असणारी शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सध्या सुरू आहे. शिवरी प्रादेशिक योजनेतून 400 केव्ही विद्युत वितरण कंपनी जेजुरीसाठी पाणीपुरवठा करत आहे. (Latest Pune News)
सध्या जलाशयामध्ये मृतसाठा असून, वीज पंप लावून पाणी चोरी केली जात आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. याबाबत महावितरण कार्यालयास पत्र दिल्याचे पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले.
तालुक्यातील 16 गावांना व वाड्या-वस्त्यांना 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. या परिसरात 24 हजार 941 लोकसंख्या आणि 43 हजार 200 पशुधनासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. मोरगाव योजना नाझरे धरणतून 17 टँकर भरले जातात.- सचिन घुबे, पाणीपुरवठा उपअभियंता, पुरंदर