पुणे : लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्रांतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या जलकेंद्राच्या अखत्यारीत येणार्या परिसराचा पाणीपुरवठा बुधवारी (दि. 19 ) बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पालिके च्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावीवस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी. टी. कवडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क ओरियंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर.