पुणे

पुणे : वॉशरूम ठरवेल तुमची किंमत! भांडारकर संस्थेमधील चर्चासत्रात सूर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : "स्मार्ट शहरात" स्मार्ट दिसायचे असेल, तर स्वच्छ्ता अधिक महत्त्वाची आहे. विदेशी लोकांच्या बरोबरीत यायचे असेल, तर आधी वॉशरूम स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कारण आता पुण्यातील तरुणाने एक अ‍ॅप विकसित केले असून, रेटिंग आधारे तुमची किंमत कळणार आहे. तसेच तुम्ही किती स्वच्छ आहात हे समजने सोपे होईल.

"हर टॉयलेट क्लीन टॉयलेट" उपक्रमांतर्गत भांडारकर इन्स्टिट्यूटच्या नवलमल फिरोदिया ऑडिटोरियममध्ये शनिवारी चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या पुण्यातील अमोल भिंगे या तरुणाने एक अ‍ॅप लाँच केले. यात स्वच्छ टॉयलेट चळवळ, भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्यासाठी रेटिंग देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. भारताच्या सॅनिटेशन समस्येबाबत प्रत्येक नागरिकास मत नोंदवून त्या संस्थेची गुणवत्ता प्रत्येकाच्या लक्षात आणून देणार आहे.

आजच्या चर्चासत्रात टॉयलेट सेवाचे फाउंडर अमोल भिंगे, डीआयसीसीआयचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, एमसीसीआयएचे प्रेसिडेंट दीपक करंदीकर, सॅनिटेशन स्पेशियालिस्ट राजीव खेर यांनी मते मांडून स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला. स्वच्छता असेल, तर नागरिकांचे आरोग्यही चांगले राहू शकते. भारतात अनेक मोठ्या संस्था आहेत. अनेक हॉटेल्स आहेत. मात्र, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर तेथील स्वच्छतेची

दुरवस्था बघता दुसर्‍यांदा जाणे प्रत्येकजण टाळत असतो. या समस्येवर तोडगा काढण्याचे काम भिंगे यांच्या अ‍ॅपने केले आहे. हे अ‍ॅप म्हणजे सरकारी यंत्रणेसह खाजगी संस्थांचेदेखील पितळ उघडे करणारे आहे. म्हणून आता प्रत्येक संस्थांची किंमत ही त्यांच्या वॉशरूमच्या स्वच्छतेवरून ठरणार असे म्हणणे वावगे होणार नाही, असाही सूर या चर्चासत्रातून निघाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT