पुणे: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीच्या पुणे विभागातील स्वारगेट आगार प्रशासनाने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त प्रवासासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील भाविकांना आता अधिक सोयीस्करपणे वारीला जाता येणार आहे.
स्वारगेट आगार प्रशासनाच्या नियोजनानुसार, वारीसाठी पंढरपूरला जाणार्या ग्रामीण भागातील नागरिकांना आता चक्क संपूर्ण एसटी बसच प्रवासासाठी बुक करता येणार आहे. ही एक महत्त्वाची सुविधा असून, यामुळे मोठ्या गटाने जाणार्या भाविकांची गैरसोय टळणार आहे. (Latest Pune News)
दरम्यान, या विशेष सुविधेचे नियोजन स्वारगेट एसटी आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढेरे आणि आगारातील इतर अधिकारी, कर्मचार्यांकडून करण्यात येत आहे.