राजगुरुनगर: खेड तालुक्यातील वाफगाव-रेटवडी जिल्हा परिषद गटातील सर्वसाधारण महिला जागेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, या चुरशीच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या इच्छुक उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांचा दबदबा दिसून येत आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या विजयाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी त्यांना विजयाचे दावेदार उमेदवार मानले जात आहे.
अश्विनीताई पाचारणे या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आहेत . बँकेतील त्यांची भूमिका त्यांना मतदार संघातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मजबूत जनाधार मिळवुन देत आहे. त्या यशस्वी उद्योजक असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या स्पष्ट समर्थनामुळे त्यांच्या विजयी वातावरणाला अधिक बळ मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अश्विनीताईंनी समाजसेवेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. त्यांच्या म्हणजे अश्विनीताई पाचारणे फाउंडेशनमार्फत मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीवर आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. मोफत चिकित्सा, मोफत औषधे आणि आरोग्य तपासणी यामुळे त्या घरोघरी पोहोचल्या आहेत. या शिबिरांमुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात त्यांचे स्थान मजबूत झाले आहे.
दिवाळी, नवरात्र, यात्रा-जत्रा अशा सण-उत्सवांमध्ये त्यांच्या समर्थकांनी मोठे योगदान दिले आहे. गावोगावच्या कार्यक्रमात सहभाग, लोकांच्या सुख-दुःखात उपस्थिती, प्रत्येक वयोगटातील व्यक्तींशी सुसंवाद आणि जाहीर सभांमधील प्रभावी भाषण कौशल्य हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. त्यांच्या सर्वसामान्य राहणीमानामुळे त्या लोकांशी सहज जोडल्या जातात. मतदार संघातील महिलांसाठी भव्य नियोजना सह सुरक्षित व आनंददायी प्रवासाच्या देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आल्या. चुल आणि मुलाच्या पलीकडे जाऊन महिलांना मिळालेल्या या आनंदाबद्दल मतदार संघात अश्विनीताई पाचारणे यांना चांगला जनाधार मिळत आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर गावोगावच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून संपर्क साधून अश्विनीताईंना पाठिंबा दिला आहे. विशेषतः तिन्हेवाडी या त्यांच्या गावाने जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला आहे. इतर उमेदवारांकडून गाजावाजा होत असला तरी अश्विनीताईंची सक्रियता आणि पूर्वीपासूनचा जनसंपर्क त्यांना सरस ठरवत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका २०२६ मध्ये जाहीर झाल्या असून, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील या गटात चुरस वाढली आहे. मात्र, अश्विनीताईंच्या कार्यकर्त्यांच्या निर्णायक फळीमुळे आणि अजित पवार गटाच्या मजबूत यंत्रणेमुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. निवडणूक ही केवळ औपचारिकता असल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे. अश्विनीताई पाचारणे यांच्या या मजबूत जनाधारामुळे वाफगाव-रेटवडी गटात त्यांचा दबदबा कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. मतदार संघातील विकास, आरोग्य आणि सामाजिक कार्य यावर आधारित त्यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे चित्र निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात समोर आले आहे.