पुणे

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज मतदान

अमृता चौगुले

पुणे : जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणार्‍या 221 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यातील सरपंचपदाच्या 167 जागांसाठी 519 उमेदवार रिंगणात आहेत, तर 1062 सदस्यपदांसाठी 3 हजार 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रविवारी (दि. 18) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 651 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तेरापैकी अकरा तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा निवडणुकीमध्ये समावेश आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. 221 ग्रामपंचायतींपैकी 27 ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध निवडून आले. तसेच, या निवडणुकीत सरपंचांची निवड थेट केली जात असून, 45 ग्रापंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता सरपंचपदाच्या 167 जागांसाठी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सदस्यपदांच्या 1062 जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी 3 हजार 13 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

SCROLL FOR NEXT