‘विघ्नहर’च्या 4 जागांसाठी आज मतदान File Photo
पुणे

‘विघ्नहर’च्या 4 जागांसाठी आज मतदान

उद्या मतमोजणीनंतर निकाल अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या असून, 4 जागांवर अतिरिक्त अर्ज आल्याने त्या जागी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शनिवारी (दि. 15) मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

दरम्यान, या निवडणुकीत कारखान्यावर 17 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची कारखान्यावर एकहाती सत्ता आली आहे. ही निवडणूक केवळ औपचारिकता म्हणून होत आहे.

शिरोली बुद्रुक गटामध्ये 3 जागांसाठी 4 अर्ज शिल्लक राहिल्याने या गटामध्ये निवडणूक होत आहे. अध्यक्ष शेरकर यांच्या शिवनेरी पॅनेलकडून ते स्वत: संतोष खैरे व सुधीर खोकराळे हे रिंगणात उभे आहेत. त्यांच्याविरोधात इनामदार रहमान अब्बास मोमीन यांचा एकमेव अर्ज आहे. तर, ओबीसी गटामध्ये सुरेश गडगे यांच्याविरोधात इनामदार रहमान अब्बास मोमीन यांच्यासह व नीलेश भुजबळ असा सामना होत आहे.

या निवडणुकीमध्ये जुन्नर गटातील अध्यक्ष शेरकर यांच्या शिवनेरी पॅनेलच्या तीनही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तसेच पिंपळवंडी, ओतूर, घोडेगाव या ठिकाणचे देखील शिवनेरी पॅनेलचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दरम्यान, मतदान केंद्रांतील साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलिस निरीक्षक, 3 पोलिस उपनिरीक्षक, 3 सहायक फौजदार, 8 पोलिस हवालदार, 23 पोलिस शिपाई असा एकूण 39 जणांचा बंदोबस्त असणार आहे.

रविवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता निवृत्तीशेठ शेरकर सांस्कृतिक भवन शिरोली बुद्रुक या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी 9 वाजता सुरू होणार असून, अंतिम निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT