पुणे

पुणे : 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व अपंग मतदार यांना घरबसल्या करता येणार मतदान

अमृता चौगुले

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २१५ कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ घोषित झाली असून मतदार ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच अपंग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता मतदारांना 'नमुना १२ डी' हा अर्ज आपले कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करणेत येत आहेत.

टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मतदारांनी सदर अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ भरून द्यावेत.याबाबत 215 कसबापेठ वि मत संघ मधील blo यांची मीटिंग घरोघरी भेट घेऊन blo यांनी 12 d अर्जाचे वाटप करणेकामी सहा निवं नि अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT