पुणे

सोमेश्वरनगर : मतदानासाठी दुबईहून गाठले गाव

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर (ता. बारामती) : गडदरवाडी  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दाम्पत्य 80 हजार रुपये खर्चून दुबईहून आले. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबईतील विमानतळावर कामाला आहेत. गडदरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली.

या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजूकडील विमान प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र, असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो असून मतदान करून वेगळे समाधान मिळाल्याची भावना सचिन यांनी व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT