VIDEO image.jpg 
पुणे

VIDEO : शिवरायांवरची श्रद्धा बघून नेटिझन्स म्हणाले जिंकलस भावा…!

अमृता चौगुले

पुणे : पुढारीऑनलाईन : बघतोस काय मुजरा कर…! जय शिवराय अशा.. घोषणांसह महाराजांच्या प्रतिमा मिरवण्यात धन्यता मानणारी; मात्र प्रत्यक्षात महाराजांच्या आदर्शाचा लवलेशही नसणारी काही मंडळी गल्लो गल्ली दिसतील; मात्र ऐन ट्रॅफिक जाममध्ये एका गाडीवर लावण्यात आलेल्या शिवरायांच्या प्रतिमेवर पडलेली धूळ दिसताच स्वत:च्या हातरुमालाने ती स्वच्छ करणाऱ्या एका दुचाकीस्वार शिवभक्ताचा व्हीडिओ समाज माध्यमांवर (सोशल मिडीयावर) तुफान व्हायरल होत आहे.

ऐन वर्दळीच्यावेळी घडलेली ही कौतुकास्पद घटना या युवकाच्या गाडीच्या मगून येणऱ्या वाहनातील कोणीतरी चित्रित केली. यावेळी ते 'छान रे मित्रा… 'तुम्हाला जर महाराजांचा मान राखता येत नसेल ना, सांभाळता येत नसेल ना तर लावू नये फोटो' अशा शब्दात या शिवभक्ताचे कौतुक करत आहेत.

दोन लाख जणांनीपाहिला व्हीडीओ

आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास दोन लाख जणांनी पहिला असून, नेटिझन्सनी या शिवभक्तांच्या कृतीला मुजरा केला आहे. अनेकांनी या युवकाचे कौतुक करताना काही नेटिझन्सनी, महाराजांची प्रतिमा लावून तिची निगा न राखणाऱ्याना चांगलेच सुनावले आहे. नुसती प्रतिमा लावून मिरवण्यापेक्षा त्यांचे आदर्श जगा…निगा रखायला जमत नसेल तर प्रतिमा लावताच कशाला….! असेही शिवभक्त व्यक्त झाले आहेत.

गणेश गायकवाड नावाच्या फेसबुक अकाऊंट वर हा व्हिडिओ शेयर करण्याताला आहे. त्यावर दिलेल्या माहितीच्या आधारे हा व्हिडिओ पुण्यातील येरवडा भागात असलेल्या फोनिक्स मॉल जवळ असलेल्या सिग्नलवर घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT