पुणे : शुक्रवार ते रविवारपर्यंत संपूर्ण विदर्भाला वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मध्यम पावसाचे संकेत दिले आहेत.
गेले 48 दिवस राज्यात उष्णतेच्या झळा सुरू होत्या. संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील वीस दिवस राज्यात उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला अन् महाराष्ट्रासह देशात पावसाळी वातावरण तयार झाले. प्रामुख्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना 21 ते 23 मार्च या कालावधीत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस) ः भंडारा (21), चंद्रपूर (21), गोंदिया (21.22), वर्धा (21.22), यवतमाळ (21)
- यलो अलर्टः (मध्यम पाऊस)ः नांदेड (21), लातूर (21), अमरावती ( 21, 22), भंडारा (22), चंद्रपूर (22), गडचिरोली (21, 22), नागपूर (21, 22), वाशिम (21, 22), यवतमाळ (23, 23)
अकोला 41.1, अमरावती 40.2, बुलडाणा 38.2, ब—ह्मपुरी 40.3, चंद्रपूर 40, गोंदिया 37, नागपूर 39.2, वाशिम 39.8, वर्धा 40.2, यवतमाळ 39.5, छ. संभाजीनगर 38, परभणी 39.9, बीड 40.2, पुणे 38.7, लोहगाव 40.3, अहिल्यानगर 38.9, कोल्हापूर 37.2, महाबळेश्वर 31.6, मालेगाव 39.8, नाशिक 36.3, सांगली 38.5, सातारा 38.7, सोलापूर 40.8.
वादळी पावसाचा इशारा विदर्भासह मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड या दोनच जिल्ह्यांना दिला असला तरी त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. शुक्रवारी दुपारनंतर राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरणासह कमाल तापमानात किंचित घट होईल, असाही अंदाज देण्यात आला आहे.
देशात कुठे कुठे पाऊस...?
पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा येथे पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.