Water  Pudhari
पुणे

Pune Water Supply Closed: वडगाव जलपुरवठा १२–१३ फेब्रुवारी रोजी देखभालीसाठी थांबणार

वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील कामांमुळे हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव, कात्रज, कोंढवा बुद्रुक आदी भागांमध्ये पाणीपुरवठा थांबणार; नागरिकांनी पाणी साठवावे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वडगाव जलशुद्धीकरण केंद्र (टप्पा-1) येथे रॉ वॉटर पाइपलाइनवर डमी प्लेट (बंद प्लेट) बसविणे तसेच केंद्रात तीन नवीन किओस्क उभारणीचे काम हाती घेण्यात येत असल्याने गुरुवारी (दि. 12) सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वडगाव जल केंद्र अखत्यारीतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 13) सकाळी उशिरापर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांमध्ये वडगाव जल केंद्र परिसरासह हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बसस्टॉप परिसर आदी भागांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT