लोणावळा : कुरवंडेगावात जनावरांना लम्पीची लागण होऊ नये, याकरिता उपसरपंच सचिन मारुती कडू यांनी पुढाकार घेत 200 जनावरांचे घरोघरी जाऊन लसीकरण करून घेतले. पशुवैद्यकीय अधिकारी वेळ देत नसल्याने व सर्वत्र लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असल्याने गावातील गोधन वाचविण्यासाठी कडू यांनी पुढाकार घेतला. त्यांना मावळ युवासेना अधिकारी शिवभक्त विजय तिकोणे यांनी लम्पी लस उपलब्ध करून दिली. यानंतर सचिन कडू यांनी गावातील घरोघरी जाऊन जनावरांचे हे लसीकरण करून घेतले आहे. लसीकरण झाल्यामुळे कुरवंडे गावातील जनावरांना लम्पी रोग होण्याचा धोका कमी झाला आहे.