पुणे

पिंपरी : महापालिकेच्या 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या 8 केंद्रांवर कोवीड प्रतिबंधक प्रत्येकी 50 कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोर्बेव्हॅक्स आणि कोव्हिशिल्ड लस राज्य शासनाकडून न मिळाल्याने या दोन्ही लस मात्र नागरिकांना मिळणार नाहीत.
सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या़ वेळेत हे लसीकरण करण्यात येणार आहे. 14 वर्षापुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला, दुसरा डोस देण्याची सोय असणार आहे. तथापि, पहिल्या डोसनंतर 28 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल. तर, 18 वर्षापुढील नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतलेला असल्यास त्यांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. प्रिकॉशन डोससाठी दुसर्‍या डोसनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेणार्‍या नागरिकांसाठी केंद्र स्तरावर कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी केलेले 50 टक्के तर, ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या 50 टक्के अशा पद्धतीने डोस दिले जातील. तर, दुसरा आणि प्रिकॉशन डोस घेणार्‍या नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना थेट केंद्र स्तरावर कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून डोस देण्यात येणार आहे. गरोदर माता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT