लेजर लाइटचा वापर; दहा गुन्हे दाखल File Photo
पुणे

Crime News Pune | लेजर लाइटचा वापर; दहा गुन्हे दाखल

मोनिका क्षीरसागर

पुणे : घातक अशा लेझर बीमलाइटवर बंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आल्यानंतरही अनेक मंडळांकडून त्याचा सर्रास वापर केला जात आहे. दहीहंडीमध्ये आदेश झुगारून लेझर लाइट वापरणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यातच आता गणेशोत्सव सुरू असून, विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइटचा वापर करणाऱ्यांना रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पुण्यामध्ये दहीहंडीपासूनच घातक अशा लेझर बीम लाइटच्या वापरास बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. लेझर लाइटचा वापर केल्यास कडक कारवाईचा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे

मात्र, २७ ऑगस्ट रोजी शहर परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. यामध्ये अनेक मंडळांनी पुणे पोलिसांचे आदेश धुडकावून लावत मोठ्या प्रमाणांत लेझर बिम लाइटचा वापर केला. याबाबत अनेक तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार पोलिसांकडून १० मंडळांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता गणेशोत्सव सुरू असून, विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी अनेक मंडळांकडून लेझर बिम लाइटचा वापर केला जातो. लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची १५ प्रकरणं गेल्यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर समोर आली होती.

आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन, तीन मंडळांवर गुन्हे

आवाज मयदिचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंढव्यातील तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवात अनेक मंडळांकडून डीजेचा वापर केला जातो. मोठ्या आवाजात साऊंड लावून मयदिचे उल्लंघन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT