LPG Cylinder Pudhari
पुणे

LPG Booking Delay: उरुळी कांचनमध्ये गॅस सिलिंडरसाठी 45 दिवसांची प्रतीक्षा

शहरीकरणानंतरही ग्रामीण निकष लागू; 25 दिवसांचा कालावधी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन: मध्य-पूर्व आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरी भागात 25 दिवस, तर ग््राामीण भागात 45 दिवसांचा बुकिंग कालावधी निश्चित केला आहे. मात्र, वेगाने शहरीकरण झालेल्या हवेली तालुक्याला अद्याप ‌‘ग््राामीण‌’ निकष लावले जात असल्याने येथील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नोकरदार आणि स्थायिक नागरिक वास्तव्यास आहेत. या भागाचे पूर्णतः शहरीकरण झाले असतानाही गॅस वितरणासाठी 45 दिवसांची मर्यादा लागू आहे. एकदा गॅस बुक केल्यानंतर दीड महिन्याने सिलिंडर मिळत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्राप्रमाणे येथेही 25 दिवसांचा कालावधी निश्चित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रशासकीय उदासीनतेचा फटका

गॅस वितरण व्यवस्था ऑनलाईन करून थेट कंपन्यांशी जोडल्याने पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, घरगुती वापराच्या गॅससाठी वर्षभर ओरड सुरूच असते. दुसरीकडे, व्यावसायिक कारणांसाठी घरगुती सिलिंडरचा काळाबाजार सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकारांकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

हवेली तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि शहरी स्वरूप विचारात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून येथील गॅस वितरणाचा कालावधी 25 दिवसांपर्यंत कमी करावा. तसेच व्यावसायिक कामांसाठी होणारा घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी ग््राामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT