पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलअंतर्गत सहायक कमांडंट (गट अ) पदांच्या एकूण 349 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याअनुषंगाने संबंधित पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठी 12 मार्चपर्यंत संधी दिली आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) 108 पदे, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) 106 पदे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) 70 पदे, सशस्त्र सीमा बल (एसएसबी) 53 पदे, तर भारत-तिबेट सीमा पुलिस (आयटीबीपी) 12 पदे, अशा एकून 349 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेतलेले आवश्यक आहे.
तसेच, 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असणार आहे. भरती नियमानुसार, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात येणार असून, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात येणार आहे. यासाठी खुला प्रवर्ग/ओबीसी उमेदवारांना 200 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आल्याचे यूपीएससीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.