पुणे : रविवारी राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने पुन्हा दाणादाण उडवून दिली असून, अनेक भागांत ६० ते ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी २७ रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होत असल्याने राज्यावर ३० ऑक्टोबरपर्यंत अवकाळीचे सावट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस थांबता थांबेना, अशी स्थिती झाली असून, सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होत आहे. मंगळवारी त्याचे महाचक्रीवादळात रूपांतर होईल. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ ३० रोजी शमणार असल्याने तोवर पाऊस राहील; मात्र ३१ ऑक्टोबरपासून राज्यातील पाऊस कमी होईल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला खोल कमी दाबाचा पट्टा जो २७ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात आणि २८ रोजी महाचक्री वादळांत रूपांतरित होईल.
पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हे चक्रीवादळ अरबी समुद्रातही येत आहे.
२७ आणि २८ ऑक्टोबर रोजी रायलसीमा, तामिळनाडू, केरळ आणि माहे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
२६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार
२७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होईल
गुजरात, तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी (७० ते २०० मिमी) झाला आहे.
ऑरेंज : (अतिमुसळधार ) : गडचिरोली (२८)
यलो अलर्ट : (मुसळधार): पालघर, ठाणे (२७, ३०), मुंबई (२७), रायगड (२७), रत्नागिरी, सिंधुदुर्ग (२७ ते ३०), धुळे, नंदुरबार (२७), नाशिक शहर व घाटमाथा (२७, ३०), पुणे शहर व घाटमाथा (२७), कोल्हापूर शहर व घाटमाथा (२७ ते २९), सातारा शहर व घाटमाथा (२७ ते २९), सोलापूर (२७), छत्रपती संभाजीनगर (२७), बीड, हिंगोली (२७), नांदेड (२७ ते २९), लातूर (२७), धाराशिव (२७), अकोला (२७,२८), अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, वर्धा, यवतमाळ (२८ ते ३०), गडचिरोली (२७, २९, ३०).