पुणे

पुणे : बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा

अमृता चौगुले

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा :  पौड रोडवरील भारतीनगर परिसरात मॅक्डोनाल्ड परिसरातील रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी वाहने उभे केली जात असल्याने रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे.

पादचार्‍यांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरातील वाहतूक बेशिस्त झाली असून, वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लघंन करीत आहेत. जागा मिळेल तिथे वाहने पार्क करण्यात येत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोथरूड डेपो बसस्थानक जवळच असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच नागरिक व वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT