पुणे

दुर्दैवी : तिसर्‍या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू : चिंचवडमधील घटना

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तिसर्‍या मजल्यावरून पडून शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर या शाळेत घडली. सार्थक हर्षवर्धन कांबळे (13, रा. काळेवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक केशवनगर येथील शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. मात्र, त्या शाळेची इमारत धोकादायक झाल्याने तेथील शाळा चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिरात स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यानंतर केशवनगर येथील शाळेतील मुले चिंचवडगाव येथील शाळेत शिकत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी मधल्या सुटीमध्ये मुले वर्गाच्या बाहेर आली. त्या वेळी शाळेतील तिसर्‍या मजल्याच्या जिन्यावरील रेलिंगवरून तोल गेल्याने सार्थक खाली पडला. या अपघातात सार्थकच्या डोक्याला जोराचा मार लागला. त्याला तातडीने चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तपास चिंचवड पोलिस करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT