पुणे

येरवडा : महापालिकेच्या इमारतीत अनधिकृत वॉशिंग सेंटर

अमृता चौगुले

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : प्रभाग क्रमांक दोन मधील आळंदी रस्त्यावर महापालिकेच्या नानासाहेब परुळेकर क्रीडा संकुलाच्या पार्किंग मध्ये महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता गाड्यांचे वॉशिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. महापालिका भवन विभागाच्या अधिका-यांचे याकडे लक्ष आहे की नाही अशी अशी विचारणा होत आहे.

महापालिकेने बांधलेल्या या वास्तूमध्ये या अगोदर असलेल्या एका आमदारांच्या संस्थेने जलतरण तलाव, व्यायाम शाळेचे महापालिकेकडे कोणतेही पैसे भरले नाहीत. नुकतीच क्रीडा विभागाने नव्याने निविदा काढून जलतरण तलाव, व्यायाम शाळा, योग सेंटर चालविण्यास दिले आहे. त्यामुळे पोहण्यासाठी आणि व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे. नागरिक आपली वाहने घेऊन येत असल्याने पार्किंग मध्ये वॉशिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे.

यासाठी पाणी, वीजेचा खर्च महापालिकेच्या खात्यावर होत असून गाड्या धुण्यासाठी प्रचलित दरानेच शुल्क आकरले जात आहे. वॉशिंग सेंटरचे पाणी चेंबर मधून बाहेर काढले जात आहे. गाड्या धुण्यासाठी मोठी प्लास्टिक टाकी ठेवण्यात आली आहे. तर मोटर देखील बसविण्यात आली आहे. गाड्या धुतलेले पाणी बाहेर येत आहे, विशेष म्हणजे बाजूलाच आरोग्य विभागाची कोठी असून त्यांनी देखील यावर दंडात्मक कारवाई केली नाही. महापालिकेच्या अशा वास्तूंचा परवानगी न घेता गैरवापर करणार्‍यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे, असे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे

चौकशीचे आश्वासन

क्रीडा विभागाच्या उपायुक्त चेतना केरूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वॉशिंग सेंटरचे फोटो मागवून घेतले आणि याबाबत चौकशीसाठी अधिकार्‍यांना पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT