कार्ला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगड किल्यावर अनाधिकृत बांधकाम उभारले गेले असून या बांधकामामुळे या गडाचे वैभव व पावित्र्य धोक्यात येऊ लागले असून हे अनाधिकृत बांधकांम काढण्यात यावे, यासाठी भाजे येथील हनुमान मंदिरासमोर समस्त हिंदू बांधवाच्या वतीने मोर्चा काढत भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी मंडावरे यांना निवेदन दिले.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लोहगड किल्ल्यावर काही अतिक्रमणे झाली आहेत.
तसेच किल्ल्याच्या पायथ्याला देखील अतिक्रमणे वाढत आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यामध्ये सदरचा किल्ला असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे असताना देखील ती न घेतली गेल्यामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत आहे.
यामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करणे तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त करत समस्त हिंदू बांधवांनी रविवार (दि. 18) लोहगड मुक्तीसाठी भाजे लेणीच्या पायथ्याजवळ एकत्र जमत आपल्या मागण्यांचे निवेदन पुरातत्व विभागाला दिले आहे. निवेदन दिल्यानंतर पुरातत्व विभागाकडून दिलेल्या निवेदनाचा विचार करुन मुंबई येथे वरीष्ठांना कळवले जाणार असून नकाशा प्रमाणे गडावर अतिक्रमणे झाले असल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा