नोकरीच्या आमिषाने दोन युवकांची फसवणूक; तोतया आयपीएस अधिकार्‍याला अटक  Jail File Photo
पुणे

नोकरीच्या आमिषाने दोन युवकांची फसवणूक; तोतया आयपीएस अधिकार्‍याला अटक

इंदापूर न्यायालयाने त्याला 17 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली

पुढारी वृत्तसेवा

Pune News: शासकीय नोकरीचे आमिष दाखवून दोघांची 7 लाख 71 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकार्‍याला अटक केली. इंदापूर न्यायालयाने त्याला 17 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तौसिम मनियार (वय 33), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी करण तनपुरे (वय 23) या युवकाने वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै 2021 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये मनियार याने तनपुरे यांना आरोग्य सेवक, तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून 2 लाख 71 हजार 500 रुपये घेऊन फसवणूक केली.

मनियार याने तनपुरे याला बनावट नियुक्तिपत्र देऊन मुंबई कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तनपुरे याने चौकशी केली असता, नियुक्तिपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. तसेच, मनियार याने अक्षय कदम यालाही पोलीस शिपाईपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून 5 लाख रुपये घेऊन फसवणूक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT