पुणे

पिंपरी : पार्किंगमधून दुचाकी पळवली

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरटयांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री नऊ ते रविवारी (दि. 6) सकाळी साडेअकरा वाजताच्या कालावधीत उत्तमनगर, बावधन येथील साई प्लॅटिनम या सोसायटीत घडली. हेमंत विजय गौरकर (27, रा. उत्तमनगर, बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दरम्यान, रात्रीच्या वेळी दुचाकीचे लॉक तोडून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलिस तपास

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT