पुणे

पुणे : नावीन्यपूर्ण विद्यापीठांमध्ये पुण्यातील दोन विद्यापीठे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभिनवतेच्या बाबतीत आपल्या कामाचा ठसा उमटवणार्‍या जगातील सर्वोत्तम अशा 100 ते 200 विद्यापीठांच्या गटांमध्ये पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. थेीश्रव' ी णपर्ळींशीीळींळशी ुळींह ठशरश्र खारिलीं (थणठख) यांच्याकडून नावीन्यपूर्ण विद्यापीठांची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे.

नावीन्यपूर्ण योगदान आणि सर्जनशील दृष्टिकोनातून येणार्‍या काळात पर्यावरण आणि समाज यांच्या सुधारणासांठी प्रयत्नशील असणार्‍या विद्यापीठांना अधोरेखित करणे हे ( थणठख) रँकिंगचे खास वैशिष्ठ्य आहे. पारंपरिक क्रमवारीत संशोधन आणि शैक्षणिक निकषांचा विचार प्राधान्याने होतो. या रँकिंगमध्ये मात्र विद्यापीठात राबविल्या जाणार्‍या अभिनव उपक्रमांवर भर दिला जातो.

विद्यापीठ प्रत्येक क्षेत्राबरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. या वेळी मिळालेले हे स्थान विद्यापीठ स्तरावर राबविण्यात येणार्‍या कालसुसंगत मॉडेलचे फळ आहे. कृतीतून शिक्षण हा विचार विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून राबवला आहे. यामुळे विद्यार्थ्यंना प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक शिक्षणाची संधी मिळते.

                                – प्रा. सिद्धार्थ जबडे, कुलगुरू, विश्वकर्मा विद्यापीठ.

देशातील 26 विद्यापीठांना मिळाले रँकिंग

या वर्षीच्या मूल्यांकन आणि रँकिंगसाठी जगाभरातील 309 विद्यापीठांनी 792अभिनव उपक्रम पाठवले होते. यात जागतिक स्तरावर प्रसिद्ध अशा एमआयटी , स्टॅनफर्ड, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया, बर्क्ले, येल, प्रिंस्टन, ड्यूक, ऑक्सफर्ड, केंबि—ज, इंपेरियल कॉलेज आणि इतरही विद्यापीठांचा समावेश होता. भारतातून सहभागी होणार्‍या विद्यापीठांची संख्या वाढताना दिसत आहे. 2020 मध्ये रँकिंगमध्ये फक्त 3 विद्यापीठांचा समावेश होता. यावेळी देशातील 26 विद्यापीठांना रॅकिंग मिळाले आहे.

रँकिंग देताना या सहा गोष्टींचा होतो विचार…
प्रकाशित संशोधनांची आकडेवारी आणि व्याख्यानरुपी अध्यापन या पारंपारिक मार्गापेक्षा औद्यागिक उपयोजनावर भर.
किती जणांना नोकरी मिळाली हा एकसुरी विचार सोडून त्यापेक्षा मूल्यवर्धन करणारी स्टार्टअप्स आणि उद्यमता घडविणे.
फक्त ज्ञान आणि कौशल्याधारित भौतिक यशापेक्षा सामाजिक दायित्व, नैतिकता आणि सचोटी यांचा विचार.
झापडबंद यंत्रणेपेक्षा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गतीशीलता, त्याचबरोबर आदान-प्रदान आणि सहयोगासाठी इतर शैक्षणिक संस्थांसोबत प्रसंगी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाण्याची तयारी.
जागतिक हवामान बदलाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन
चौथ्या औद्योगिक उत्क्रांतीच्या टप्प्यावर डिजीटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, बिग-डेटा, क्लाऊड सर्व्हिसेस, ब्लॉकचेन आणि अशा अनेक माध्यमातून साधलेली किमया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT